या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§१३४ ]
२१५
स्फुट प्रकरणे.
मोडली जीर्ण देवाल्यें । तेंची लोकांसी मानती ।
भांडती देवळासाठीं। देव चुकोनि राहिला ॥
शरीरमात्र देवाल्यें । जीर्ण सांडुनी जातसे ।
नूतनें रम्य देवाल्ये । त्यामध्ये देव नाटकु ॥
ठकु रे ठकु रे मोठा । ठकीतो जनमानवी ।
मानवी दानवी काया । काया माया पाहा बरी ॥
थोर देवाल्य मुळींचें । ईश्वरु जगदेश्वरु ।
देवदेव्या बहुरूपा । अर्धनारीनटेश्वर ॥
त्यापुढे तीन देवाल्ये । ब्रह्मा विष्णु महेश्वरु ।
तया अभ्यांतरी देवो । तो देव सत्य जाणिजे ॥
तोचि जो तो हा जाणा । नानां देवाळयांमधे ।
औतरे[१] देवळामधे । त्यासी औतार बोलिजे ॥
आतां म्यां काये सांगावें । सांगावें त्या परमेश्वरा ।
अखंड अंतरी घ्यावें । जावें रे निश्चळाकडे ॥
-रामदासांची कविता ४३९. १-२२.
१३४ गुरुशिष्यसंवादात्मक दासबोधाचा सोलीव अर्थ.
धैर्याचे आसन बळकट । आणि इंद्रिये वोढुनी सघट ।
धरे ऊर्ध्वपंथे वाट नीट । अढळपदी लक्ष लावी ॥१५॥
तैं मार्गाची करूं नव्हाळी । प्रथम घंटा नादाची नवाळी ।
दुसरी किंकिणीची मोवाळी । तिसरी अनुहत कोल्हाळ ॥१७॥
आतां अग्री लक्ष लावी । काय दिसेल ते न्याहाळीं ।
चंद्रज्योती प्रकाशली । विभु बांधिला बळकट ॥१८॥

- ↑ अवतार घेतो.