पान:रामदासवचनामृत.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२११ । की प्रसन्न होतो. . - १३० ] - अभंग, पदें, वगैरे. १२७. देवाचा वियोग नाहीं तो योग.. योगियांचा देव मज सांपडला । थोर लाभ जाला येकायेकीं ॥१॥ येकायेकी येक त्रैलोक्यनायेक । देखिला सन्मुख चहूंकडे ॥२॥ चहूंकडे देव नित्य निरंतर । व्यापूनी अंतर समागमे ॥ ३ ॥ समागम मज रामाचा जोडला। वियोग हा केला देशधडी ॥४॥ देशधडी केला विवेके वियोग । रामदासी योग सर्व काळ ॥ ५ ॥ १२८. देव एकाएकी प्रसन्न होतो. आलभ्याचा लाभ आकस्मात जाला। देव हा वोळला येकायेकीं॥१॥ येकायेकी सुख जाहाले येकट । वर्थ खटपट साधनाची ॥२॥ साधनाची चिंता तुटली पाहातां । वस्तुरूप होता वेळ नाहीं॥ ३॥ वेळ नाहीं मज देवदरुशणा । सन्मुखचि जाणा चहूंकडे ॥ ४॥ चहूंकडे मज देवाचे स्वरूप । तेथें माझें रूप हारपलें ॥५॥ हारपले चित्त देवासी चिंतीतां । दास म्हणे आतां कोठे आहे ॥६॥ १२९. देवाचें सर्वत्र दर्शन. संताचेनि संगे देव पाठी लागे। सांडूं जातां मागें सांडवेना ॥१॥ सांडवेना देव सदा समागमीं । बाह्यअंतर्यामी सारिखाची ॥२॥ सारिखाची कडां कपाटीं सीखरीं । गृहीं वनांतरी सारिखाची ॥३॥ सारिखाची तीर्थी सारिखाची क्षत्रीं। दिवा आणि रात्री सारिखाची।४। सारिखाची अंत नाहीं तो अनंत । रामदासी कींत मावळला ॥५॥ १३०. राघवाच्या भेटीने अमृतत्व, बहु काळ गेले देवासी धुंडीतां । देव पाहों जातां जवळीच ॥१॥ जवळींच असे पाहातां न दिसे। संन्नीधची वसे रात्रदिस ॥२॥ रात्रदिस देव बाबअभ्यांतरीं । जीवा क्षणभरी विसंभेना ॥ ३॥ .. विसंभेना परी जीव हे नेणती ।जाती अधोगती म्हणोनियां ॥४॥ १ क्षेत्र. २ किंतु, शंका.