पान:रामदासवचनामृत.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० [१२3. रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. म्हणे रामीरामदास वरीं पडो आकाश। राघवाची कास न सोडी सत्य ॥६॥ १२४. आतां तरी जाय जाय. आतां तरि जाय जाय जाय । धरि सद्गुरुचे पाय ॥ध्रु०॥ संकल्प विकल्प सोडुनि राहे । दृढ धरुनी पाय पाय पाय ॥१॥ .. नामस्मरण ज्या मुखिं नाहीं । त्याने वांचुनि काय काय काय ॥२॥ मानवतनु ही न ये मागुती। बरें विचारुनि पाहें पाहें पाहे ॥३॥ आत्मानात्मविचार न करितां । व्यर्थ प्रसवली माय माय माय ॥४॥ सहस्र अन्याय जरी त्वां केले। क्षमा करिल गुरु माय माय माय॥५॥ रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय खाय खाय ॥६॥ १२५. देव जवळ असून भेट नाही. देव जवळी अंतरीं । भेटी नाहीं जन्मवरी ॥१॥ मूर्ति त्रैलोक्यी संचली । दृष्टि विश्वाची चुकली ॥२॥ भाग्ये आले संतजन । झाले देवाचे दर्शन ॥३॥ रामदासी योग झाला । देहीं देव प्रगटला ॥४॥ १२६. एकही क्षण वायां न दवडितां देवाचें चिंतन, शिक जांभई खोकला । तितुका काळ व्यर्थ गेला ॥१॥ आतां ऐसें न करावें । नाम जीवीं तें धरावें ॥२॥ श्वास उश्वास निघतो। तितुका काळ व्यर्थ जातो॥ ३ ॥ पात्या पाते न लगत । तितुकें वय व्यर्थ जात ॥४॥ लागे अवचित उचकी । तितुकें वय काळ लेखी ॥५॥. म्हणे रामीरामदास । होतो आयुष्याचा नाश ॥ ६॥