पान:रामदासवचनामृत.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. १२३ ] अभंग, पदें, वगैरे. .. २०९ आतां एकचि मागणे । कृपा करूनियां देणें ॥३॥ ज्याची दर्शनाची आशा । त्याची पुरवावी इच्छा ॥४॥ ऐक सखया वचन । त्यासी देईन दर्शन ॥५॥ तेरा अक्षरी मंत्राचा । जप करील जो साचा ॥६॥ गणना होतां तेरा कोटी । त्यासी भेटेन जगजेठी॥७॥ भय न धरावें मनीं। बहू बोलिलों म्हणुनी॥८॥ नलगे आसनी बैसावें । नलगे अन्नही त्यागावें ॥९॥ . येतां जातां धंदा करितां । जपसंख्या मात्र होतां ॥१०॥ तेरा कोटी गणना तेची। पापें निरसती जन्मांतरींची॥११॥ त्यासी देईन दर्शनें। तात्काळचि मुक्त होणे ॥ १२ ॥ ऐसा वर होतां जाण । दास झाला सुखसंपन्न ॥१३॥ १६. अभंग, पदें, वगैरे. । १२३. “ राघवाची कास न सोडी सत्य." जठरी लागो क्षुधा होत नाना आपदा। - भक्तिप्रेम कदा न संडी सत्य ॥१॥ शब्द न फुटे तरी चिंतीन अंतरीं। भक्तिपम परी न संडो सत्य ॥२॥. नानापरी आघात चिरकाल होत । . भक्तिप्रेमामृत न संडी सत्य ॥ ३ ॥ दाहूं वडवानळ अथवा दंशू काळ । भक्तिप्रेमबळ न संडो सत्य ॥४॥ आतांच हा देह राहो अथवा जावो। भक्तिप्रेमभावो न संडी सत्य ॥५॥