पान:रामदासवचनामृत.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२०] . सांप्रदायिक. . २०७ .१२०. "भीमरूपी स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती। वनारी अंजनीसूता । रामदूता प्रभंजना ॥१॥ महावळी प्राणदाता । सकळां उठवी बळें । सौख्यकारी शोकहारी। धूर्त वैष्णव गायका ॥२॥ दीननाथा हरीरूपा । सुंदरा जगदांतरा। पातालदेवताहंता। भव्य सिंदुरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना। पुण्यवंता पुण्यशीला । पावना परितोषका ॥ ४॥ ध्वजांगें उचली बाहो। आवेशे लोटला पुढे । कालाग्नी कालरुद्राग्नी । देखतां कांपती भयें ॥५॥ ब्रह्मांड माईल नेणों । आवळे दंतपंगती। नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा । भ्रकुटी ताठिल्या बळे ॥६॥ पुच्छ तें मुर्डिलें माथां । किरीटी कुंडलें बरी। सुवर्ण कटि कांसोटी। घंटा किंकिणी नागरा ॥७॥ ठकारें पर्वता ऐसा । नेटका सडपातळू। चपळांग पाहतां मोठे। महाविद्युल्लतेपरी॥८॥ कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपाचे उत्तरेकडे। मंद्राद्रीसारिखा द्रोणू । क्रोधे उत्पाटिला बळें ॥९॥ आणिला मागुती नेला । आला गेला मनोगती। मनासी टाकिले मागें। गतीसी तुळणा नसे ॥ १०॥ १ सुंदर...