पान:रामदासवचनामृत.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०] सांप्रदायिक. द्विजवर्य सूर्य जैसा तपोधन। अद्भुत विंदान झाले तेथें ॥ १२ ॥ झाली रामनवमी मध्य अष्टमीसी। अर्धरात्री त्यासी दूत आले ॥१३॥ दूत आले पुढे घालोनि चालिले। महाद्वारा आले भीम जेथें ॥ १४॥ भीमदेवालयी नेऊनी तयासी। तेथे उभयतांसी देखियेलें ॥ १५ ॥ देखियेलें राजपुत्र सूर्यवंशी। झापड नेत्रांसी पडे तेव्हां ॥ १६ ॥ पडे तेव्हां जसा दंडवत भूमी। मग अंतर्धामी बोलाविलें ॥ १७॥ बोलवूनि माथां ठेवी सव्य पाणी। मंत्र सांगे की रामनाम ॥ १८ ॥ नाम सांगुनियां तानमूर्ति रम्य । पहाभिश्रीराम दिधला तया ॥१९॥ तया दिला वर तुज पुत्र होतील। ध्वज उभारतील रामदास्यें ॥२०॥ रामदास्य झालें धन्य वंशोद्धार । बोलोनि सत्वर गैब झाले ॥ २१ ॥ झाला रामनवमी महोत्सव थोर । मध्यान्हीं सत्वर जन्म झाला ॥२२॥ १ लीला, करणी, २ मारुति.