पान:रामदासवचनामृत.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[११८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. ११८. रामदासांचे स्वचरित्रकथन. नमो अधिष्ठाता विष्णु मुख्य साधु । तेथूनियां बोधु विधीलागीं ॥१॥ विधीपासुनियां ज्ञान विधिसुता। तेंचि ज्ञान प्राप्त वसिष्ठासी ॥२॥ वसिष्ठे उपदेश केला रामचंद्रा। तोचि महारुद्रा हनुमंता ॥३॥ हनुमंत कलीमाजि चिरंजीव । झाले देव सर्व बौद्धरूप ॥४॥ बौद्ध नारायण होऊनी बैसला। उपाव बोलिला व्यासमुनि ॥ ५॥ व्यासमुनि बोले भविष्यपुराण। जग उद्धरणे कलीमाजी ॥ ६॥ कलीमाजी गोदातीरीं पुण्य क्षेत्र । तेथें वातपुत्र अवतरे ॥७॥ अवतरे अभिधानी रामदास। कृष्णातीरीं वास जगदुद्धारा ॥ ८॥ जगदुद्धारासाठी श्रीरामा सांकडें । केलें वाकोडें भक्तिपंथें ॥९॥ भक्तिपंथे मोठा केला श्रीरामाने। जंबू अभिधानें ग्राम तेथें ॥ १० ॥ तेथें ब्रह्मनिष्ठ अधिष्ठाता पूर्ण। सूर्य नामा जाण द्विजवर्य ॥११॥