पान:रामदासवचनामृत.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११.] सांप्रदायिक. रामवरदायिनी माता। गर्द घेऊनि उठली। मार्दले पूर्विचे पापी । आनंदवनभुवनीं ॥ प्रत्यक्ष चालली राया। मूळमाया समागमें । नष्ट चांडाळ ते खाया । आनंदवनभुवनीं ॥ भक्तांसि रक्षिले मागें। आतांही रक्षिते पहा। भक्तांसि दिधलें सर्वै। आनंदवनभुवनीं ॥ देवभक्त येक जाले । मिळाले जीव सर्वही । संतोष पावले तेथें। आनंदवनभुवनीं ॥ मनासी प्रचीत आली । शब्दी विश्वास वाटला। कामना पुरती सर्वै । आनंदवनभुवनीं ॥ -रामदासांची कविता ४२१. १-५३. . १५ सांप्रदायिक. .. ११७. रामदासांचे गुरु कोण ? आदिनारायण सद्गुरु आमुचा। शिष्य झाला त्याचा महाविष्णु ॥१॥ तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस । तेणें ब्रह्मयास उपदेशिलें ॥२॥ ब्रह्मदेवें केला उपदेश वसिष्ठा । तेथें धरा निष्ठा शुद्धभावो ॥३॥ वसिष्ठ उपदेशी श्रीरामरायासी । रामें रामदासी उपदेशिलें ॥४॥ उपदेश देवोनि दिधला मारुती। स्वयें रघुपती निरवीता॥१॥ निरवितां तेणे झालों रामदास । संसारी उदास म्हणोनियां ॥२॥ म्हणोनि आमुचे कुळी कुळदैवत । राम हनुमंत आत्मरूपी ॥३॥ आत्मरूपी झाला रामीरामदास । केला उपदेश दीनोद्धारा ॥४॥