या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२
[§११६
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.
स्वधर्मा आड जे विघ्ने । तें तें सर्वत्र उठिलीं ।
लाटिली कुटिली देवें । दापिली कापिली बहु ॥
खौळले[१] लोक देवाचे । मुख्य देवचि उठिला ।
कळेना कायरे होतें । आनंदवनभुवनीं ॥
देवदेव बहु देव । नाना देव परोपरी ।
दाटणी जाहली मोठी । आनंदवनभुवनीं ॥
कल्पांत मांडला मोठा । म्लेंच्छ दैत्य बुडावया ।
कैपक्ष घेतला देवीं । आनंदवनभुवनीं ॥
बुडाले सर्वही पापी । हिंदुस्तान बळावलें ।
अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवनभुवनीं ॥
पूर्वी जे मारिले होते । तेचि आतां बळावले ।
कोपला देव देवांचा । आनंदवनभुवनीं ॥
येथून वाढिला धर्मु । रमाधर्म समागमें ।
संतोष मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ॥
बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला ।
मोडिलीं मांडिली क्षेत्रे । आनंदवनभुवनीं ॥
उदंड जाहले पाणी । स्नानसंध्या करावया ।
जपतप अनुष्ठानें । आनंदवनभुवनीं ॥
लिहिला प्रत्ययो आला । मोठा आनंद जाहला ।
चढता वाढता प्रेमा । आनंदवनभुवनीं ॥
बंड पाखंड उडालें । शुद्ध अध्यात्म वाढलें ।

- ↑ खवळले.