पान:रामदासवचनामृत.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० रामदासवचनामृत--संकीर्ण ग्रंथ. [११५ त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जे मनी धराल तें श्री सिद्धीस पाववील. त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक (पा. भे. दुराढे)लोकांचा नाश करावा, विपुल द्रव्ये करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशी स्थळे दुर्घट करावीं ऐसें जें जें मनीं धरिलें तें तें स्वामींनी आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केले. .. याउपरि राज्य सर्व संपादिले तें चरणी अर्पण करूनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनी आणिला तेव्हां आज्ञा जाहली की, “ तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय." ऐसें आज्ञापिलं. . यावरून निकटवास घडुनु वारंवार दर्शन घडावें; श्रीची स्थापना कोठे तरी होउनु सांप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीर्ण घडावी ऐसी प्रार्थना केली. तेही आसमंतात् गिरिगव्हरी वास करुनु चाफळी श्रीची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली. त्यास चाफळी श्रीची पूजा मोहोछाव ब्राह्मणभोजन, अतिथि, इमारत सर्व यथासांग घडावे. जेथे जेथे श्रीची मूर्तिस्थापना जाहाली तेयें उछाव पूजा घडावी. यास राज्य संपादिले. यांतील ग्रामभूमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हां आज्ञा जाहली की “ विशेष उपाधीचे कारण काय ? तथापि तुमचे मनीं श्रीची सेवा घडावी हा निश्चय जाहला त्यास यथाअवकाश जेथे जें नेमावेसे वाटेल ते नेमावे, व पुढे जसा सांप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तैसें करीत जावें.” याप्रकारें आज्ञा जाहली.