मरणहाक तो चुकेना । देह वांचवितां वाचेना ।
विवेकी होऊन समजाना । काय करावें ॥१४॥
भले कुळवंत म्हणावें । तेही वेगीं हजीर व्हावें ।
हजीर न होतां कष्टावें । लागेल पुढें ॥१५॥
एक जाती दोन जाती पावला । तो कैसा म्हणावा भला ।
तुम्हां सकळांस कोप आला । तरी क्षमा केली पाहिजे ॥१६॥
देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते ।
देवदास पावती फत्ते । यदर्थी संशय नाहीं ॥१७॥
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुखबडवा का बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ॥१८॥
विवेक विचार सावधपणें । दीर्घ प्रयत्न केलाचि करणें ।
तुळजावराचेनि गुणें । रामें रावण मारिला ॥१९॥
अहो हे तुळजा भवानी । प्रसिद्ध रामवरदायिनी ।
रामदास ध्यातो मनीं । यन्निमित्त ॥२०॥
आश्विन शु॥ १० शके १६००.
श्रीसद्गुरुवर्य श्रीसकळतीर्थरूप श्रीकैवल्यधाम,
- श्रीमहाराज स्वामीचे सेवेसी.
चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना जे मजवर कृपा करुनु सनाथ केले. आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून धर्मस्थापना, देव-ब्राह्मणाची सेवा, प्रजेची पीडा दूर करुनु, पाळण, रक्षण करावें; हे व्रत संपादून