पान:रामदासवचनामृत.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१r विन्मुख मरणीं नर्क होती। वांचून येतां मोठी फजिती। इहलोक परलोक जाती । पहाना कां ॥३॥ मारितां मारितां मरावें । तेणे गतीस पावावें। फिरोन येतां भोगावें । महद्भाग्य ॥४॥ नजर करारी राखणे । कार्य पाहुनि खतल करणे। तेणें रणशूराची अंतःकरणें । चकित होती ॥५॥ जैसा भांड्याचा गलोला। निर्भय भारामधे पडिला । तैसा क्षत्री रिचवला । परसैन्यांमध्ये ॥६॥ निशंकपणे भार फुटती । परवीरांचे तवके तुटती। जैसा बळिया घालुनि घेती। भैरी उठतां ॥७॥ ऐसे अवधेच उठतां । परदळाची कोण चिंता। हरणे लोळवी चित्ता। देखत जैसा ॥ ८॥ मर्दै तकवा सोडूं नये । म्हणजे प्राप्त होतो जय। कार्य प्रसंग समय । ओळखावा ॥९॥ कार्य समजेना अंतरें । तें काय झुंजेल बिचारें। युद्ध करावें खबरदारे । लोक राजी राखतां ॥१०॥ दोन्ही दळे एकवटें । मिसळताती लखलखाटें। युद्ध करावें खणखणाटें । सीमा सांडुनी ॥ ११॥ देव मात्र उच्छेदिला । जित्यापरीस मृत्यु भला। आपुला स्वधर्म बुडविला । ऐसें समजावें॥१२॥ मराठा तितका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा । ये विषयीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥ १३॥ The - - १ तोफ. २ गोळा. ३ सेंन्य.