पान:रामदासवचनामृत.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. १९५ ११२] ऐतिहासिक. संसारीं मोकळं केलें । आनंदी ठाव दिधला। तोडिली सर्वही चिंता । तूं माया सत्य जाहालें ॥ पुर्विल काय मी सांगों। ईच्छा पूर्ण परोपरीं । मागील आठवेनासें । केलें आश्चीर्य वाटलें ॥ सदानंदी उदो' जाला । सुख संतोष फावला। पराधेनता गेली। सत्ता उदंड चालिली ॥ उदंड ऐकिलें होतें । रामासी वरु दीधला। मी दास रघुनाथाचा। मजही वरदायनी ॥ श्रेष्ठांचा नौस जो होता। तो भी फेडीनसें म्हणे । पुष्प देउनि उतराई । ऐसें हें कल्पिलें मनीं ॥ तुळजापुर ठाकेना । चालिली पश्चिमेकडे। पारघाटी जगन्माता। सद्य येउनी राहिली ॥ ऐसे हे ऐकिलें होतें । हेत तेथेंचि पावला। पुष्पाची कल्पना होती । तेथें पुष्पचि दिधलें। ऐसी तूं दयाळु माता। हेमपुष्पाचे घेतलें। संतुष्ट भक्तिभावाने । त्रैलोक्यजननी पाहा ॥ थोड्याने श्लाध्यता केली । थोर संतोष पावलों। उत्तीर्ण काये म्यां व्हावें । तुझे कृपेसी रोकडें ॥ तुझेंची तुजला दिल्हें । म्यां हे कोदुनि आणिलें। संकट वारिली नाना। रक्षिलें बहुतांपरी॥ जीवींचे जाणते माता । तूं माता मज रोकडी। लोकांच्या चुकती माता । आचुक जननी मला ॥ १ उदय. २ हल्ली.