पान:रामदासवचनामृत.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [६१११ सुंदर मूर्ति सुंदर गुण । सुंदर कीर्ति सुंदर लक्षण । सुंदरमठी देव आपण । वास केला ॥ सुंदर पाहोन वास केला। दास संनिध ठेविला। अवघा प्रांतचि पावन केला । कृपालुपणें ॥ बावी पोखरणी झरे। टांकी विशाळ सुंदरें। ठाई ठाई विशाळ मनोहरें । स्थळे निर्मिलीं ॥ _ कडे कपाटें दरे दकुंटें। पाहों जातां भयचि वाटे। ऐसे स्थळी वैभव दाटे । देणे रघुनाथाचें ॥ अंतर्निष्ठ अखंडध्यानी। संनिध रामवरदायनी। विश्वमाता त्रैलोक्यजननी । मूळमाया ॥ -विविधविषय २. १३७-१३८. ११२. प्रतापगडच्या भवानीचे स्तोत्र प्रपंची आमचे कुळीं । तुळजा कुळदेवता। नेणतां ऐकिलें होतें । जाणतां स्मरलें मनीं ॥ श्रेष्ठांची कामना होती। पुर्विली मनकामना। नौसं जो नौसिला होता । तो त्यापासुनि चुकला ॥ पुत्रची घेतला त्यांचा । जोगी करुनि सोडिला। ख्यानति दाविली मोठी। न्याय नीति चुकेचिना ॥ वैराग्य घेतलें पोटीं । सर्व संसार सांडिला । तुझिया दर्शना आलों। कृपादृष्टी नवाजिलों॥ तुझा नवाजिला आहे । महंत म्हणती जनीं। तुझेंची सर्वही देणे । सर्वही तुजपासुनी ॥ १ प्रतापगडची भवानी. २ नवस. ३ ख्याती. ४ प्रसिद्ध झालो.