पान:रामदासवचनामृत.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९३ १११] । ऐतिहासिक. मान्य होतां जप सांगावा । मग तो इकडे पाठवावा। मग तयाचा सकळ गोवा । उगऊं आम्हीं॥ -विविधविषय १. १४ १-१४२. - १११. सुंदरमठ. परंतु येकवचनी देव एक । जेणे सोडिले देव अनेक । सेवाहीन मी सेवक । त्याचा म्हणवी॥ समर्थ अंगिकार केला । नाना संकटी रक्षिला। . त्याचिया अन्ने पिंड वाढविला । जन्मवरी॥ मारुतीसारिखे सेवक । तेथे मी मानवी रंक। नवल सामर्थ्याचे कौतुक । काये सांगों ॥ समर्थ आणि दीननाथ । वैभवें समर्थाहून समर्थ । जेणे माझे मनोरथ । पूर्ण केले ॥ जें जें मनें अभिळासिलें । तें तें समर्थे पुरविलें। मज दीनास वाढविलें । मर्यादेवेगळें ॥ समर्थाने समर्थ करावें । तरीच समर्थ म्हणवावें। त्रैलोक्यास पडिलें ठावें । सामर्थ्य ज्याचें ॥ देवमात्र जांजावला । म्हणोनि कैपक्षी पावला। भुवनकंटक निर्दाळिला । दशमुख शत्रु ॥ जिहीं त्रैलोक्य जिंकिलें । त्यास मर्कटाहातीं मार विलें। भुवनत्रय आनंदविलें। दाशरथीनें ॥ बिभीषणास दिधली लंका। सुरवरांची फिटली शंका। समर्थ रामदास रंका। नवाजिलें। H -- - -- १ संशय, संकट, विकल्प. २ त्रासला. ३ रक्षणकर्ता. ४ प्रसिद्ध केलें.