पान:रामदासवचनामृत.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

O रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१.. ११०. रामदासांचे महंतास पत्र. विवेक जालियां देवाचा योग । मग होणार नाहीं वियोग। देव सर्वांचे अंतरंग । अखंडित भेटी॥ या समाधाने असावें । निरूपणी विवरावें। मानसपूजनें आठवावें । सकळ कांहीं॥ ऋणानबंधे भेटी होईल । परस्परें समाचार कळेल। सहज वर्तमान निवळेल । ते प्रसंगी॥ कांहीं समुंदाव करणें । ये विषीं आलस्य न करणे। .. आलस्य करितां उदंड उणें । दिसेल परमार्थी ॥ पोहोणारे बुडते तारावे । सामर्थ्य बुडों नेदावे । मूर्ख ते शाहाणे करावे । विवेकी पुरुषे ॥ आपणाहुन जो धींग । त्यासी करूं नये प्रसंग। आपणाधीन जो प्रसंग । तोचि करावा ॥ सोईयाधाईयाची मुलें । तीक्षण बुधीची सखोलें। तयासी बोलणे मृद बोलें । करित जावें ॥ त्याचा संसार समाचार । पुसत जावा विस्तार । उदंड सांगतां तत्पर । होऊनि ऐकावें ॥ दुःख ऐकतां दुःख जाते। त्याचे दुःख हळु होतें। मग तें सर्वेचि धरिते। मित्रभावें ।।। निकट मित्रि बरी होतां । मग त्यासी न्यावें येकांता। म्हणावें रे भगवंता। कांहीं त-हीं भजावें ॥ पूर्वी देव पूजिला नव्हता । म्हणोनि आली दरिद्रता । या कारणे अनंता। कांहीं तन्ही भजावें ॥ १ शिष्यसमुवाय. २ वरचढ. क