पान:रामदासवचनामृत.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९१ ६१.९] ऐतिहासिक. आवडीच्या गुणे कल्याण होईल ऐसें नेमस्त चिन्ह दिसते. आपण ते कर्कष सीतलाईमधे बहुताच श्रम पावलों, तो माझा सकळ श्रम घेउनु निरोप दिधला तो देव जाणे. येविसी चीत चमत्कारलें तें पत्रीं किती म्हणौनु लेहावें ? माझें अरिष्ट तुझी घेऊन मज उष्ण देशासी पाठविले हा उपकार श्रीरघुनाथजीस जाला. मज रघुनाथजीवेगलें कोण्ही जिवलग नाहीं; आपण जाल समाचार रघुनाथजीस विदित केला. या उपरी माझे ठाई तुम्ही आहा. रघुनाथकृपेचा प्रत्यये तुम्हास आलियावरी प्रचितीसी कलों येईल. बहुत काये लेहावें ? वेदमूर्ती दिवाकरभट गोसावी तेथें आलियावरी तुम्ही माझा समाचार घेयासी ये प्रांतास आले पाहिजे. स्नेह बहुत असों दीजे हा पत्रार्थ. हे इतकें म्यां आवडीच्या कलवळ्याने लिहिले आहे. मने मन साक्ष असेल. परंतु तुम्हांस उपचारसा वाटोन रंजीस होल तरी न होणे. जैसा दिवाकरभट तैसे तुम्ही हा इत्यर्थ आहे. बरे कलले पाहिजे. तुमचा आमचा येकांत प्रसंग जालियावरी मग ऐसे लिहितां न ये, म्हणौनि संधीमधे प्रसंग फावला पुढे फावेना म्हणौनि लाँबेकरून लिहिले. वरकड इतर भाव मनामध्ये असेल तरी रघुनाथ साक्ष असे. तुम्ही रजीस न होणे आणि जे आहे ते लिहिले यांमधे मिथ्या स्तुती नाही. तुम्ही सर्वज्ञ आहा. तुमचे जे काही आहे ते सकल माझें चि आहे. म्या मज माझ्या मनास येईल तैसे लिहिले येथे तुमचे काये गेलें ! कांहीं चिंता न कीजे. तुम्ही आमचेचि आहा, तुम्ही आम्ही सकल देवाचे आहों. शरीरभेदावरी न जाणे. अंतरस्थिति पाहिल्याउपरी कलों येईल. -सांप्रदायिक, कागदपत्रे. १ निश्चयपूर्वक. २ असंतोष. ३ विस्तारपूर्वक....