पान:रामदासवचनामृत.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. .... बहुत सबळ सांठा मागतों अल्पवाटा।। न करित हित कांटा थोर होईल ताठा ॥ कृपणपण नसावें भव्य लोकी दिसावें। । अनुदिन करुणेचे चिन्ह पोटीं वसावें ॥८॥ जलधर करुणेचा अंतरामाजी राहो। तरि तुज करुणा हे कां न ये सांग पाहों॥ कठिण हृदय झाले काय कारुण्य केलें। न पवसि मज कां रे म्यां तुझे काय केलें ॥९॥ वडिलपण करावें सेवका सांवरावें। अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ॥ निपटाच हटवादें प्रार्थिला शब्दभेदें। कपि घन करुणेचा वोळला राम तेथें ॥ १० ॥ बहुतचि करुणा ही लोटली देवराया। सहजचि कफ गेलें जाहली दृढ काया॥ परम सुख विलासे सर्वदा दासनूसे । पवनज तनुतोषे वंदिला सावकाशें ॥ ११ ॥ १४, ऐतिहासिक, १०९. समर्थांचे स्वहस्तलिखित पत्र. - श्रीरामसमर्थ. उत्तमगुणाळंकृत रघुनाथभक्तिपरायेण परोपकार राज्यमान्य राजेश्री रघुनाथभट गोसावी यांसी स्नेहपूर्वक सूचना. तुमचा निरोप घेउनु हेलवाकीहून स्वार जालों तें सुखरूप चाफलास पावलो. संकल्पाची समारादनाही झाली. पुढे शरीराचा उपचार ही हळुहळु होतो. तुमचे मन मजवरि बहुत आहे ते तुमचे