Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§१०८ ]
१८९
करुणाष्टकें
परदळ शरघातें कोटिच्या कोटि प्रेतें ।
अभिनव रणपातें दुःख बीभीषणातें ॥ २ ॥
कपिरिसघनदाटी जाहली थोर दाटी ।
म्हणवुनी जगजेठी धावणे चार कोटी ॥
मृत विर उठवीले मोकळे सिद्ध झाले ।
सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥ ३ ॥
बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणदाता ।
उठवि मज अनाथा दूर सारूनि वेथा ॥
झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया ।
रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥ ४ ॥
तुजविण मजलागीं पाहतां कोण आहे ।
म्हणवुनि मन माझें तूझि रे वास पाहे ॥
मज तुज निरवीले पाहिजे आठवीलें ।
सकळिक निजदासांलागि सांभाळवीलें ॥ ५ ॥
उचित हित करावे उद्धरावें धरावें ।
अनुचित न करावें त्वां जनीं येश घ्यावें ॥
अघटित घडवावें सेवका सोडवावें ।
हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ॥ ६ ॥
प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया ।
परदळ निवटाया दैत्यकुळे कुडाया[]
गिरिवर तुडवाया रम्य वेशे नटाया ।
तुजचि अलगडाया ठेविलें मुख्य ठाया ॥ ७ ॥

  1. ठार मारण्यास