Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८
[§१०७
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.

पिशुनें वाटतो सर्वे कोणीही मजला नसे ।
समर्था! तूं दयासिंधू बुद्धि दे रघुनायका ॥ ११ ॥
उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे ।
तूं भक्तवत्सला रामा बुद्धि दे रघुनायका ॥ १२ ॥
कायावाचामनोभावें तुझा मी म्हणवीतसें ।
हे लाज तूजला माझी बुद्धि दे रघुनायका ॥ १३ ॥
सोडवील्या देवकोटी भूभार फेडिला बळें ।
भक्तांसि आश्रयो मोठा बुद्धि दे रघुनायका ॥ १४ ॥
उदंड भक्त तुम्हांला आम्हांला कोण पूसतें ।
ब्रीद हे राखणे आधी बुद्धि दे रघुनायका ॥ १५ ॥
उदंड ऐकिली कीर्ति पतीतपावना प्रभो ।
मी एक रंक दुर्बुद्धि बुद्धि दे रघुनायका ॥ १६ ॥
आशा हे लागली मोठी दयाळू बा दया करी ।
आणीक नलगे कांहीं बुद्धि दे रघुनायका ॥ १७ ॥
रामदास म्हणे माझा संसार तुज लागला ।
संशय वाटतो पोटी बुद्धि दे रघुनायका ॥ १८ ॥

१०८. रामदासांस कफव्यथा झाली असता त्यांनी केलेलें
मारुतीचे करुणाष्टक.
फणिवर उठवीला वेग अद्भूत केला ।
त्रिभुवनजनलोकी कीर्तिचा घोष केला ॥
रघुपतिउपकारें दाटले थोर भारें ।
परम धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ॥ १ ॥
सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झालें ।
कपिकटक निमाले पाहतां येश गेलें ॥