पान:रामदासवचनामृत.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८७ - १०४ ] करुणाष्टकें. कौतुक पाहतोसी काय जानकीकांता। दयाळा दीनबंधो भक्तवत्सला ताता ॥४॥ १०७. बुद्धि दे रघुनायका. युक्ति नाही बुद्धि नाहीं विद्या नाहीं विवंचितां ॥ नेणता भक्त मी तूझा बुद्धि दे रघुनायका ॥१॥ मन हे आवरेना की वासना वावडे सदा । कल्पना धांवते सैरा बुद्धि दे रघुनायका ॥२॥ अन्न नाहीं वस्त्र नाहीं सौख्य नाहीं जनांमधे । आश्रयो पाहतां नाहीं बुद्धि दे रघुनायका ॥३॥ बोलतां चालतां येना कार्यभाग कळेचिना। बहु मी पीडिलों लोकी बुद्धि दे रघुनायका ॥ ४॥ तुझा मी टोणपा झालों कष्टलों बहुतांपरी। सौख्य तो पाहतां नाहीं बुद्धि दे रघुनायका ॥ ५ ॥ नेटके लिहिता येना वाचितां बुकतों सदा। अर्थ तो सांगतां येना बुद्धि दे रघुनायका॥६॥ प्रसंग वेळ तर्कना सुचेना दीर्घसूचना। मैत्रिकी राखितां येना बुद्धि दे रघुनायका॥ ७॥ कळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु । प्रत्यहीं पोट सोडीना बुद्धि दे रघुनायका॥८॥ संसार नेटका नाहीं उद्वेगू वाटतो जिवीं। परमार्दू कळेना की बुद्धि दे रघुनायका ॥९॥ देईना पुर्विना कोणी उगचि जन हांसती। विसरू पडतो पोटी बुद्धि दे रघुनायका ॥१०॥