पान:रामदासवचनामृत.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ LI रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१०५ : उपाधीस देखोनि वाटे सरावें। रघुनायका काय कैसें करावें ॥ ३ ॥ अवस्था मनों होय नानापरीची। किती काय सांगू गती अंतरींची ॥ विवेकेंचि या मानसा आवरावें । रघुनायका काय कैसें करावें ॥ ४॥ म्हणे दास ऊदास झालों दयाळा । जनों व्यर्थ संसार हा वायचाळा ॥ तुझा मी तुला पूसतों प्रेमभावें । रघूनायका काय कैसें करावें ॥५॥ १०६. रामाचा धांवा. धांव रे रामराया किती अंत पाहासी ॥ ध्रु०॥ प्राणांत मांडिलासे नये करुणा कैशी। पाहीन धणिभरी चरण झाडीन केशी । नयन शिणले बा आतां केधवां येशी ॥१॥ मीपण अहंकारें अंगीं भरला ताठा । विषयकर्दमांत लाज नाहीं लोळतां। चिळस उपजेना ऐसें जाले बा आतां ॥ २॥ मारुतिस्कंधभागी शीघ्र बैसोनि यावें। राघवें वैद्यराजे कृपाऔषध द्यावें। दयेचे पद्महस्त माझे शिरी ठेवावे ॥३॥ या भवीं रामदास थोर पावतो व्यथा। २ वायफळ खळ.