पान:रामदासवचनामृत.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत नीच दास्यत्वाची गोडी पतकरणे, यथानुशक्ति सामग्री घेऊन ईश्वरयज्ञास प्रवृत्तः होणे, मुखी नाम हाती टाळी वाहन ईश्वराचे गुणसंकीर्तन करणे, आघातांत धारिष्ट धरणे, पदार्थमात्रावर चित्त न लागतां मनांत भगवंताचा ध्यास लागणे, भगवंता.. करितां सर्व सुख सोडून देणे, शरीर सत्कार्थी लावण्याचा निश्चय करणे, समुद्राऐशी चित्तांत सांठवण बाळगणे ही होत (क. ४६ ). ईश्वरसाक्षात्कारास मुख्य साधन म्हटले म्हणजे नामस्मरण हे होय. प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नेमानें साधन करून नेहमी नामस्मरण करति जावें, सुखदुःख, संपत्तिविपत्ति, संकट आनंद वगैरे कोणत्याही स्थितीत नामस्मरण सोडूं नये. नामाने संकट नासतात, व विघ्नं निवारतात; महापापी तेच पवित्र होतात. कांहीं न करिता नामजप केला असतां चक्रपाणी संतुष्ट होऊन भक्तांस सांभाळतो. लहानथोर, उच्चनीच, बाह्मणअंत्यज, हा भेद नामस्मरणामध्ये नाही ( क्र. ४७). नामस्मरणरूप उपासनेचा पाठिंबा जेथें नाहीं तेथें जय प्राप्त होणार नाही (क्र. ४८ ).. प्रत्येक चळवळीच्या मुळाशी भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे. पायरीनें पायरी चढून मुळापर्यंत शोधिलें असतां याचा उलगडा होणार आहे (क्र.४९). ईश्वराबइल नामस्मरणरूप भक्ति करणे ती निष्काम करावी. कामनेने मिळालेले फळ व निष्काम भजनाने मिळालेला भगवंत यांमध्ये महदंतर आहे. निष्कामभजन करणान्या भक्ताच्या मनांत जो हेतु उत्पन्न होतो तो देव आपणच पुरवितो. ( क. ५० ). निष्कामभजनाच्या जोडीला श्रवणाचे बळ पाहिजे. श्रवणानें भक्ति व विरक्ति उद्भवतात, चित्तशुद्धि होते, निश्चय घडतो, आशंका फिटतात, मन ताब्यांत येते व त्यास भगवंताची भूक लागते ( क. ५१ ). श्रवणाप्रमाणेचः कीर्तनाचीही फार जरूरी आहे. कीर्तनांत स्त्रियादिकांचे कोतुक वर्णिले असतां श्रोत्यावक्त्यांचे मन कामाकार होऊन ईश्वराचें ध्यान नाहींसें होतें. निःशंक निर्लज्ज कीर्तन केलें असतां गुप्त परमात्मा प्रकट होतो ( क्र.५२ ). अशा रीतीने, ज्याच्या जवळ ईश्वर अखंड राहतो तो जे सहज बोलतो ते ईश्वराचेच शब्द. होत ( क. ५३ ). .. १४. साधकांस ध्यानक्रिया सांगितली असतां मनामध्ये कल्पनेचे काहूर उठून ध्यानयोग सिद्ध होत नाही हा साधकांचा.अनुभव सर्वांस माहीत. आहेच.... याकरितां मन निर्विकल्प करण्याबद्दल रामदासांनी एक उपाय सुचविला आहे. जसा काम कामाने मरतो तशी कल्पना कल्पनेने मरते (क्र. ५.). निर्दि