पान:रामदासवचनामृत.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना . असा जो गुरु तो एकापरी देवापेक्षाही श्रेष्ठ समजला पाहिजे (क्र. ३६); अशा सद्गुरूस सागर, मेरु, गगन, पृथ्वी, गभस्ति, फणिवर, कल्पतरु, इत्यादिकांपैकी कोणतीही उपमा लागू पडत नाही. सद्रूचे वर्णन करतां येणे अशक्य आहे, हेच त्याचे वर्णन होय (क्र. ३७). अशा सद्गरूची चिन्हें कोणती म्हणाल तर ती शुद्ध आत्मज्ञान, स्वरूपस्थितीचे समाधान, प्रबळ वैराग्य, निर्मळ आचार, अखंड अध्यात्मश्रवण, तत्त्वज्ञानविचार ही होत (क्र. ३८). ज्याच्या पोटांत अमृत गेले त्याचे शरीर तेजस्वी व्हावयासच पाहिजे. जो स्वरूपस्थितीने वर्ततो तोच साधु. राज्यावर बसल्यावर अंगी राजकळा सहजच बाणते; त्याप्रमाणे स्वरूपारूढ झाल्यावर कामक्रोध, मदमत्सर, लोभशोक, मोहभय, इत्यादि विकार सहजच नाहीसे होतात. स्वधर्माची व्याख्या म्हणजे केवळ स्वरूपस्थितीत राहणे हीच होय (क्र. ३९ ). आजपर्यंत कोणत्या चक्रवर्ती राजाने सायुज्यमुक्ति दिली आहे ? जे त्रैलोक्यांत नाही त्याचे दान संतसज्जन करितात. जे चंद्रसूर्याने प्रकाशित होत नाही ते या साधूच्यामुळे प्रकट होते (क्र. ४०); असे साधु जेथें भजन करितात तेथे प्रत्यक्ष जगदीश उभा असतो ( क्र. १). या साधूंच्या मार्गे जे चमत्कार होतात ते केवळ हे पुण्यमार्गाने चालले म्हणूनच होतात. अशा साधूंस वासना धरून पुनः जन्म घेण्यास लावू नका (क्र. १२); पूर्वी मोठमोठे भक्त होऊन गले व त्यांचे सामर्थ्यही अद्भत होते असे समजून हल्लीच्या साधूंस तुच्छ करूं नका; शरीराचा ध्यास केवळ सामर्थ्यसिद्धीकडे असल्याने मनुष्य सहज ईश्वराचा मार्ग चुकून जातो; तर असें न करतां ईश्वरप्राप्तीच्या कामनेखेरीज दुसरी कोणतीही कामना मनात बाळगू नये (क्र. ४३). १३. ज्याच्यामध्ये ही ईश्वरकामना उत्पन्न झाली, जो अत्यंत साक्षपी, धैर्यवान् व प्रज्ञावंत आहे, जो त्रिविधतापाने पोळून जाऊन गुरुवचनावर दृढभाव ठेवितो, व आकाश कोसळून पडले असतांही ज्याच्या शुद्ध भावार्थात पालट होत नाही, तोच सच्छिण्य होय (क्र. 7 ). अशा शिण्यास मोक्षप्राप्तीस . मुळीच वेळ लागत नाही. लोहपरिससंयोग, गंगासरितासंयोग, अगर बिंदुसागर-संयोगाप्रमाणे अशा शिष्यास तत्क्षणीच मोक्ष मिळतो ( क. ४५). ज्यांत सत्त्व गुणाचे वर्चस्व असेल असाच सच्छिण्य शिष्यराज या नांवास शोभतो. सत्त्वगुणाची लक्षणे म्हटली म्हणजे संसारदुःख विसरून भक्तिमार्गाकडे तांतडीने ओढ घेणे,