पान:रामदासवचनामृत.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०५] . करुणाष्टकें कितेकी देह त्यागिले तूजलागीं। पुढे जाहले संगतीचे विभागी॥ देहदुःख होतांचि वेगें पळालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥६॥ सदासर्वदा राम सोडोनि कामी। समर्था तुझे दास आह्मीं निकामी ॥ . बहू स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलों। तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलो ॥७॥ किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांति ॥ परस्तावलों कावलों तप्त झालों। तुझा दास मी व्यर्थे जन्मास आलों ॥८॥ १०५. रघुनायका, काय कैसे करा ? उदासीन हा काळ जातो गमना । सदा सर्वदा थोर चिंता शमेना॥ उठे मानसीं सर्व सोडोनि जावें। रघुनायका काय कैसें करावें ॥१॥ जनीं बोलता बोलतां वीट वाटे। नसे अंतरीं सूख कोठे न कंठे॥ घडीने घडी चित्त कीती धरावें। रघूनायका काय कैसे करावें ॥ २॥ बहू पाहतां अंतरीं कोड होतो। शरीरास तो हेत सांडोनि जातो॥