पान:रामदासवचनामृत.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [1.3 भुमिधरनिगमांसी वर्णवेना तयासी। सकळभुवनवासी भेटि दे रामदासी ॥ १५ ॥ १०४. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों. असंख्यात ते भक्त होऊनि गेले। तिहीं साधनांचे बहू कष्ट केले ॥ नव्हे कार्यकर्ता भुमीभार झालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १ ॥ बहू दास ते तापसी तीर्थवासी। गिरीकंदरीं भेटि नाहीं जनासी॥ स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालों। ... तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों॥२॥ सदा प्रेमळांसी तयां भेटलासी। तुझ्या दर्शनें स्पर्शनें पुण्यराशी। अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों॥ ३ ॥ तुझ्या प्रीतिचे दास जन्मासि आले। असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥ बहू धारणा थोर चंकीत झालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥४॥ बहूसाल देवालयें हाटकाचीं। रसाळा कळा लाघवे नाटकाची ॥ पुजा देखतां जाड जीवीं गळालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलों ॥५॥ १ आश्चर्यचकित. २ सोन्याची.