Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§१०३]
१८३
करुणाष्टकें
जलधरकणआशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥९॥
तुजविण मज तैसें जाहलें रामराया ।
विलग विषम काळी सांडिती सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
विषय वमन जैसें त्यागिले सर्व कांहीं ॥१०॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।
रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥
जिवलग जिव घेती प्रेत सांडोनि देती ।
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥११॥
सकळजन भवाचे आखिले वैभवाचे ।
जिवलग मज कैंचे चालतें हेंच साचें ॥
विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी ।
रघुवर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२॥
सुख सुख म्हणतां तें दुःख ठाकोन आलें ।
भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झालें ॥
भ्रमुनि मन कळेना हीत तें आकळेना ।
परम कठिण देहीं देहबुद्धी गळेना ॥१३॥
उपरति मज रामी जाहली पूर्णकामी ।
सकळभ्रमविरामी[] रामविश्रामधामीं ॥
घाडि घडि मन आतां रामरूपी भरावें ।
रघुकुळटिळका रे आपुलेसे करावे ॥१४॥
जळचर जळवासी नेणती त्या जळासी ।
निशिदिनि तुजपाशीं चूकलों गूणराशी॥

  1. जेथें सकळभ्रम विराम पावतात असा.