पान:रामदासवचनामृत.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ १०३ . - - रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. रघुकुळटिळका रे हीत माझें करावें। दुरित दुरि रहावें म्यां स्वरूपी भरावें ॥३॥ तन मन धन माझे राघवा रूप तूझें। तुजविण मज वाटे सर्व संसार ओझें ॥ प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी। अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥ चपळपण मनाचें मोडितां मोडवेना। सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥ घार्डधार्ड विघडे हा निश्चयो अंतरींचा। म्हणवुनि करुणा हे बोलतों दीन वाचा ॥५॥ जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी। मजवरि करुणेचा राघवा पूर लोटी॥ तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । षडरिपुकुळ माझे तोडिं याचा समंधू ॥६॥ तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी। . शिणत शिणत पोटी पाहिली वाट तूझी ॥ झडकरि झड घालीं धांव पंचानना रे। तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥७॥ सवळ जनक माझा राम लावण्यपेटी। म्हणवुनि मज पोटी लागली आस मोठी ॥ दिवस गणित बोटीं प्राण ठेवोनि कंठीं। अवचट मज भेटी होत धालीन मीठी ॥ ८॥ जननिजनकमाया लेंकरूं काय जाणें । पय न लगत मूखीं हाणितां वत्स नेणे॥ .