पान:रामदासवचनामृत.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०] __ करुणाष्टकें १८१ धनें धान्य पात्रे अळंकार चीरें । विसोर घरे सुंदर रम्य सारे ॥ देहे चौलतो. सर्व आरोग्य ज्याचा । जनी जाणिजे योग हा - सुकृताचा ॥ ४ ॥ मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी । मनासारिखे लोक शोकापहारी। मनासारिखा संग साधुजनाचा । जनी जाणिजे योग हा सुकृताचा ॥५॥ मनासारिखें चिंतितां देव पावे । मनासारिखे भक्त भावे मिळावे । सदा बोलती बोल सारांश वाचा । जनी जाणिजे योग हा - सुकृताचा ॥६॥ म्हणे दास सायास केल्यां घडेना। विकल्पं जनीं एक ठाई पडेना। घडे योग होतां विवेकी जनाचा । जनीं जाणिजे योग हा .. सुकृताचा ॥७॥ १०३. अनुदिनि अनुतापें. अनुदिनि अनुतापें तापलों रामराया। परम दिनदयाळा नीरसी मोहमाया। अचपळ मन माझें नावरे आवरीतां । तुजविण शिण होतो धाव रे धांव आतां ॥१॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला। स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी। सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥ विषयजनित सूखे सूख होणार नाहीं। तुजविण रघुनाथा ओखंटे सर्व काहीं॥ ___१ वस्त्रे. २ विश्रांतिस्थाने. ३ व्यर्थ. . - - - LE.