पान:रामदासवचनामृत.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१०॥ चतुरपण जनी हे पाहतां आढळेना । निकट रघुविराचे रूप कैसे कळेना। . . चपळ मन वळेना गर्वताठा गळेना। तुजविण जगदीशा कर्मरेखा टळेना ॥२॥ तरुणपण देह्याचे लोपतां वेळ नाहीं। तन मन धन अंतीं वोसरे सर्व कांहीं। सकळ जन बुडाले वेर्थ मायाप्रवाहीं। झडकरि सुमना रे हीत शोधूनि पाहीं ॥३॥ पळपळ चळताहे बाळ तारुण्य देहीं। तळमळ विषयांची नेणवे हीत कांहीं। लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे। जळजळ सितळा हे भक्ति सेऊनि राहे ॥४॥ दिनकरकुळवल्ली लोटली आंगभारें। रघुविरअवतारें दाटली थोरथोरें। सुखरूप सुखवासि राहिले योगरासी। - सफळ सितळ छाया फावली रामदासीं॥५॥ १०२. जनी जाणिने योग हा सुकृताचा. मनासारिखी सुंदरा ते अन्यया । मनासारिखे पुत्र ज्यामात कन्या। सदा सर्वदा बोलती रम्य वाचा। जनी जाणिजे योग हा सुकृताचा ॥१॥ भली मायबापें भले मित्र बंधु । भले सोयरे राखती स्नेहवादु । मुलें लेकुरे येक मेळा सुनांचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥२॥ भले धाकुटे थोरले सर्व काहीं । भले गोत्रजु भिन्न भावार्थ नाहीं। अखंडीत हा काळ जातो सुखाचा।जनी जाणिजे योग हासुकृताचा॥३॥ १ लाळ टाकणे.