पान:रामदासवचनामृत.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

F१०.] .. करुणाष्टकें.. १७९ दिनाचें उणें दीसतांलाज कोण्हा।जनी दासदीसे तुझा दैन्यवाणा । सिरी स्वामितूरामपूर्णपतीपी। तुझा दास पाहें सदा सीघ्रकोपी ॥३॥ रघुनायेका दीन हातीं धरावें। अहंभाव छेदूनियां उधरावें । अगुणी तयालागीं गुणी करावें। समर्थ भवसागरी उतरावें ॥४॥ किती भार घालू रघुनायेकाला। मजकारणें सीण होईल त्याला। दिनानाथ हा संकटीं धांव घालीं। तयाचेन हे सर्व काया निवाली ॥५॥ मजकोंवसा राम कैवल्यदाता। तयाचेन हे फीटली सर्व चिंता। समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें। सदा सर्वदा नाम वाचे म्हणावें ॥६॥ १००, सर्वोत्तमा } मन भेट देसी. दुःखानळे मी संतप्त देहीं । तुजवीण रामा विश्रांति नाहीं। आधार तुझा मज मी विदेसीं। सर्वोत्तमा मैं मज भेटि देसी ॥१॥ प्रालब्ध खोटें आभिमान आला । स्वामी समर्था वियोग जाला। तेणें बहु क्षीति वाटे मनासी । सर्वोत्तमा के मज भेटि देसी ॥२॥ तुझिया वियोगें बहु वेधना रे । विवेक नाहीं आम्हां दिनारे। पडिला समंधु या दुर्जनेसीं । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥ ३॥ संसारचिंता मज वाटते रे। रामा प्रपंची मन जातसे रे। संसर्ग आहे इतरां जनासीं । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥४॥ १०१. रघुविरभजनाची.. रघुविरभजनाची मानसीं प्रीति लागो। रघुविरस्मरणाची अंतरीं वृत्ति जागो। रघुविरचरणाची वासना वास मागो। रघुविरगुण गातां वाणि हे नित्य सांगों ॥१॥ १ रक्षण करणारा, आश्रय.