पान:रामदासवचनामृत.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [९८ घरें सुंदरें सौख्य नानापरीचें । परी कोण जाणेल तें अंतरींचें। मनी आठवितांचि तो कंठ दाटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे॥२॥ बळे लावितां चित्त कोठें जडेना । समाधान तें कांहि केल्या घडेना। नव्हे धीर नैनी सदा नीर लोटे। उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥ ३ ॥ आवस्था मर्ना लागली काय सांगों। गुणी गुंतला हेत कोण्हासि मागों। बहुसाल भेटावया प्राण फूटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे॥४॥ कृपाळूपणे भेट रे रामराया। वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया। जनामाजिलोकीक हा ही न सूटे। उदासीन हा काळ कोठेंन कंठे॥५॥ आहा रे विधी तां असे काय केलें । पराधेनता पाप माझें उदेलें। बहुतांमधे तूकती तूक तूटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥६॥ समर्था मनी सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी। घडेना तुझा योग हा प्राप्त खोटें। उदासीन हा काळ कोठे न कंठे॥७॥ अखंडित हे सांग सेवा घडावी। न होतां तुझी भेटि काया पडावी । दिसेंदीस आयुष्य हे व्यर्थ आटे। उदासीनहा काळ कोठें न कंठे॥८॥ भजा काय सर्वां परी हीण देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा। म्हणों काय मी कर्म रेखा न लोटे । उदासीन हा काळ कोठेन कंठे ॥९॥ म्हणे दास मी वास पाहें दयाळा। रघुनायेका भक्तपाळा भुपाळा। पहावें तुलाहे जिवीं आर्त मोठे। उदासीन हा काळ कोठें न कंठे॥१०॥ ९९. नसे भक्ति ना ज्ञान. नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काहीं। नसे प्रेम हे रामविश्राम नाहीं। असा दीन अज्ञान मी दास तुझा। समर्था जनीं घेतला भार माझा॥१॥ रघुनायेका जन्मजन्मांतरींचा। अहंभाव छेदूनि टाकी दिनाचा। जनीं बोलती दास या राघवाचा। परी अंतरीं लेश नाहीं तयांचा॥२॥ पर नयन, डोळा. २ वजन करणे. ३ वाट. ४ इच्छा...