पान:रामदासवचनामृत.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ ९६ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. दुराशा नको रे परस्त्रीधनाची। नको तूं करूं नीच सेवा जनाची। पराधीन कैसा मला दीससी रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ नको योग अष्टांग तो रोध प्राणा। नको कृच्छचांद्रायणी हट्ट जाणा। अपभ्रंश हा मार्ग की वोखटा रे। हरे राम हा मंत्र सोपा रे॥ तपस्वी मनस्वी भले पार गेले। दुजी सृष्टिकर्ते असे थोर मेले। चिरंजीव कल्पायु गेले किती रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥ नको सोंग छदें करूं ढोंग कांहीं। नको शिष्यशाखा मठी सुख नाहीं। महंतीमुळे नाश होतो तपारे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥ कलीं साधनें याविणे सर्व निंदीं। हरे राम हा मंत्र जो त्यासि वंदीं। हरे राम हे मालिका साधकां रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥ रा. श्लो. (८).