पान:रामदासवचनामृत.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

F .१७५ ....६९६ ] ... राममंत्राचे श्लोक. पिंडज्ञान तत्त्वज्ञान । आत्मज्ञान ब्रह्मज्ञान । पिंडब्रह्मांड सकळ शोधून । राहिले जें ॥ ६९ ॥ पदार्थज्ञानाचा बडिवार । त्याहूनि थोर ईश्वर । ऐसे प्राणी लहान थोर । सकळ जाणती ॥ ७० ॥ ___ज. गो. १-७०. १२ राममंत्राचे श्लोक. ९६. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. नको शास्त्रअभ्यास वित्पत्ति मोठी। जडे गर्व ताठा अभीमान पोटी। कसा कोणता नेणवे आजपा रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ खुळे हस्तपादादि हे भग्न होती। दिठी मंद होऊनियां कर्ण जाती। तनू कंप सर्वागिं होती कळा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥ कफें कंठ हा रुद्ध होईल जेव्हां । अकस्मात् तो प्राण जाईल तेव्हां । तुला कोण तेथे सखे सोयरे रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ १ लुले. ..