पान:रामदासवचनामृत.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत- संकीर्ण ग्रंथ. गोसावी वाघ होतो । दुसन्या वाघाली मारितो। भुंक कोनि मरतो । उतार नाहीं ॥५८॥ साधी बाळंतिणीची खापरी । वोहरें साधी नानापरी । तूप घे घागरीच्या घागरी। गुरु आमुचा ॥ ५९॥ मेल्या माशा उठविती । तुळसी देवावरी पाडिती। ऐशा नाना करामती । भूमंडळीं ॥६०॥ अमुच्या गुरूची मोठी महंती । नाना अभक्ष भक्षिती। लोकांदेखता फुलें करिती । मद्यमांसाचीं ॥ ६१॥ एक गोसावी पृथ्वीवरी । त्याची कोणी न पवे सरी। जेथे बैसे तेथें वोहरीं। सावकाश करी ॥ ६२ ॥ .. एक गोसावी महा भला । पोरी वाळवंटी पुरिला। येक तो पडोनिच राहिला । कित्येक दिवस ॥ ६३ ॥ येक गोसावी भाग्य देती। एक गोसावी पुत्र देती। गोसाव्याने नवस चालती । नानाप्रकारें॥६४ ॥ जें जें मनामध्ये चिंतावें । तें तें गोसाव्यांनी जाणावें। चुकले ठेवणे काढून द्यावें । नाना प्रकारें ॥ ६५ ॥ सुडक्यामध्ये लाह्या भाजिती। थोड्या द्रव्यांचे उदंड करिती। पराची खबुत्रे नाचविती । नाना प्रकारे॥६६॥ हारपलें सांपडून द्यावें। चोरटें तात्काळ धरावें। थोडे अन्न पुरवावें । बहुत जनांसी ॥ ६७ ॥ ऐसें वर्ततें लोकीं। येणें सार्थक नव्हे की। अध्यात्मविद्या विवेकी। जाणतसे ॥ ६८॥ १ कवची, परटी. २ जादूटोणा. ३ जुनें फडके.