Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§९५]
१७३
जनस्वभावगोसावी.
गर्भिणीस कन्या की पुत्र । हे ठाउके आहे यंत्र ।
गोसाव्यांनी विद्यामात्र । अभ्यासिली ॥४७॥
भांडविद्या अभ्यासिली । तस्करविद्या कळों आली ।
विचारे पाहिली । वसुंधरा ॥४८॥
आमुचे गुरु अधिक गुणें । डोईचें करी रांधणे ।
लोकांचे नवस पुरवणे । नानाप्रकारें ॥४९॥
मेले प्राणी उठविले । साकरेचे मीठ केलें ।
गटगटां अग्नीस गिळिलें । काय सांगों ॥५०॥
गोसावी समाधीस बैसला । दुसरे वेळे उघडून पाहिला ।
पूर्वेचा पश्चिमेस गेला । अकस्मात् ॥५१॥
लिंगाचे तुकडे तोडिती । कोटिलिंगें एकचि करिती ।
मोजवून दाळी[] चारिती । पाषाणनंदी ॥५२॥
आसन घातले जळावरी । पाहतां तो पैलतिरीं ।
आमुचा गुरु समुद्रावरी । चालत जातो ॥५३॥
पुरुषाची करी वनिता । वनितेचा पुरुष मागुता ।
अन्न खाऊन तत्वतां । दिशा[] नाहीं ॥५४॥
नानाजिन्नसी अन्न खाणें । परी उदक नाही घेणें ।
शापून भस्मचि करणें । ऐसा गुरु ॥५५॥
अन्न उदंडचि खाणे । किंवा उपवास करणें ।
गोमुख तोंडे जेवणे । यथासांग ॥५६॥
गुरु वाघासी भेटला । वाघे चरचरा चाटिला ।
वस्त्रे बांधोनी आणिला । घरास वाघ ॥५७॥

  1. डाळ.
  2. शौच.