Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
[§९५
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.
धारबंद नजरबंद । नाना घुटके काम बंद ।
पोर मोहरे नाना बंद । नाना प्रकारें ॥३६॥
अग्नीमध्ये परी जळेना । लोकांमध्ये परी कळेना ।
देखतां देखतां अस्माना[] । वेधून जाय ॥३७॥
जाणे दुसऱ्याचे जीवींचें । वांझपण फेडिलें वांझेचें ।
मन बिघडी दंपत्याचें । एकही करी ॥३८॥
त्याचे मोठे नवल की गा । मृत्तिकेच्या करी लवंगा ।
ब्राह्मण समंध अंगा । आणून दावी ॥३९॥
मातीची साखर केवळ । ढेकळाचा करी गूळ ।
धोत्र्यांच्या बोंडांची केवळ । वाळकें करी ॥४०॥
श्वास कोंडी दिशा कोंडी । पाडी तिडकेने मुरकुंडी ।
धडा माणसाची मान वांकडी । करून मोडी ॥४१॥
ऐशापरीच्या करामती । भोंपळे पोटांत चढविती ।
मनुष्याचे पशु करिती । निमिषमात्र ॥४२॥
गुरु भविष्य सांगती । रेड्याकरवीं वेद म्हणविती ।
गधड्याकरवी पुराणे सांगविती । सामर्थ्यबळें ॥४३॥
कुतऱ्याकरवीं रागोद्धार । कोंबड्याकरवी तत्त्वविचार ।
खेचर आणि भूचर । सकळ बाधी ॥४४॥
घुटका घटकेने करावा । फुटका कवडा वेचों न द्यावा ।
उदंड बचनाग साधावा । येकायेकीं ॥४५॥
वाळलीं काष्ठे हिरवाळली[] । आंधळी डोळसें झाली ।
पांगुळे धांवों लागलीं । चहूंकडे ॥४६॥

  1. आकाश.
  2. हिरवी झाली, पल्लवित झाली.