पान:रामदासवचनामृत.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. $ ९५ ] जनस्वभावगोसावी. म्हणती आमुच्या घरीं। मोठी विद्या पंचाक्षरी। चे. चेटकीं नानापरी । लोकांमध्ये ॥२५॥ अखंड राहे स्मशानीं । सटवी मेसको मावराणी। नाना कुजत्रे येथुनी। शिकोनि जावीं ॥ २६॥ . एक म्हणती गोसावी । गारुड्यास वेड लावी। त्याचे सर्पचि पळवी । चहूकडे ॥ २७ ॥ कुसळी विद्या दृष्टिबंधन । तत्काळ सभामोहन। उच्चाटण आणि खिळण । मोहनी विद्या ॥२८॥ आमुचे गोसावी महायोगी । औषधे देती जगालागीं । नपुंसक वनिता भोगी। चमत्कारें ॥ २९ ॥ ... आमुचा गोसावी साक्षेपें । अखंड करिती सोने रुपें । अंजन साधन त्यापें । काय उणें ॥३०॥ मोठा बडिवार गुरूचा। विंचू उतरी ठाईचा। तैसाचि उतार सर्पाचा । ठाईंचा होय ॥ ३१॥ ... जंबुक मुसके खिळावीं । चोरटी करावी वोणचीं। अखंड भूतें राबवावी । नाना जिनसीं ॥ ३२ ॥ आमुचा गुरु गुप्त होतो। दुजे दिवशी उमटतो। अचेतन चालवितो । मोठा ज्ञानी ॥ ३३ ॥ .. व्याघ्रावरी निःशंक । हातीं सर्पाचा चाबुक। वांचले होते सहस्र एक । सामर्थ्यबळें ॥ ३४॥ दांत पाडोनी निघाले । पांढरे केश काळे झाले । किती आले आणि गेले । गोसाव्यादेखतां ॥ ३५ ॥ - ६ कपटविद्या. ७ उंदीर.