पान:रामदासवचनामृत.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९५ १७० . रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [ लक्षण नेणे अवलक्षण । भाग्य नेणे करंटपण । ज्ञान नेणे अज्ञान । परम अन्यायी ॥१४॥ एक उपदेश घेती। देवतार्चन टाकून देती। धर्मनीति बुडविती । महापाषांडी ॥१५॥ म्हणती आमुचा गुरु । तयाचा अगाध विचारु । तेथें अवघा एकंकारु । भेद नाहीं ॥१६॥ एक म्हणती गुरु आमुचा । करी अंगिकार विष्ठेचा ॥ तयासारिखा दुजा कैंचा। भूमंडळीं ॥१७॥ एक म्हणती एकचि तो। अखंड ओक वर्पितो। बरें वाईट पाही तो । गोसावी कैंचा ॥१८॥ अंगीकार करी सौख्याचा । तो गोसावी काशाचा। पहा गोसावी आमुचा । गुहाडींत लोळे ॥ १९॥ ओक नरक आणि मृत । निःशंक घटघटां घेत । लोकांमध्ये मोठा महंत । तया म्हणावें ॥ २० ॥ ओंगळपणाची स्थिती । स्वयें ओंगळ करिती। शुचिष्मंत महापंडितीं। मानिजेना ॥ २१ ॥ बरें जैसे जैसे मानले । तैसें तैसें घेतलें। येथे आमुचे काय गेलें । होईना कां ॥ २२॥ एक.म्हणती अर्गळा । भूताळा आणि देवताळा। . जनांमध्ये आग्या वेताळा । चेतऊं जाणे ॥ २३ ॥ म्हणती आमुचा गुरु । जाणे चेटकाचा विचारु। भूर्ते घालून संहारूं । समर्थ असें ॥२४॥ ५ ओरपणे, खादाड रीतीने खाणे.