पान:रामदासवचनामृत.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६९ ॥ ९५] जनस्वभावगोसावी. रत्ने सोडून एकवटिल्या। शुभा जैशा ॥३॥ फाल्गुन मासींचा खेळ । जैसा अवघा बाष्कळ।। तेथें पाहोनि निर्मळ । काय घ्यावें ॥४॥ प्रत्ययज्ञानेंविण । करी अनुमानाचा शिण। शत्रु आपणासि आपण । होऊन राहे ॥ ५॥ त्यासी कोणे उमजवावें । मानेल तिकडे न्यावें। आंधळे गुरू स्वभावें । धांवे चहूंकडे ॥६॥ जिकडे तिकडे ज्ञान झालें । उदंड गोसावी उत्तले। तयांचे संगती झाले । बाष्कळ प्राणी॥७॥ भ्रष्ट ओंगळ अनाचारी। कुकर्मी अनुपकारी । विचार नाहीं अविचारी । जेथें तेथें ॥ ८॥ गर्भाधा कैंची परीक्षा । दीक्षाहीनासी दीक्षा । प्रमाण मानी प्रत्यक्षा। विवेकहीन ॥९॥ कशापासून काय झालें । ब्रह्मांड कोणी निर्मिले। कांहीं न कळतां भुंकलें । गाढव जैसें ॥ १० जें वेदशास्त्रीं मिळेना । अध्यात्म कांहीं कळेना। माजला बोका आकळेना। रेडा जैसा ॥११॥ कोण दीक्षा आहे कैसी । अविवेक स्थिति ऐसी। ..... न पाहतां वसवसी । श्वान जैसें ॥ १२ ॥ ऐसे प्रकारांचे जन । चित्ती अवघा अनुमान। प्रतीतीवणि ज्ञान । उगेंच बोले ॥१३॥ १ गोवन्या. २ मातले. ३ मूर्ख, वटवट करणारा, ४ गुरगुरणे.