या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८
[§९४
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.
ऋषी मुनी आणि सुरवर । आदि करूनियां हरिहर ।
येणेंचि मार्गे पैलपार । पावती सकळ ॥ ५८ ॥
मागां जाहाले आतां होती । होऊनि नाही पुनरावृत्ति ।
ऐसी अभंग ऐक्यस्थिति । वर्तल्यासहित ॥ ७० ॥
सकळ भक्त मिळाले । हरिहरब्रह्मादि आले ।
ऐक्यरूपें राम जाले । रामसाहित ॥ ७० ॥
जितुकें दृश्य साकार । आहे अनमेय[१] अपार ।
तोचि उसळले धूसर । रक्त श्वेत सुगंध ॥ ७२ ॥
पंचभूतीं कर्पूरगोळ । ज्ञानरूपें झाला प्रबळ ।
ओवाळूनियां सकळ । निवांत झाले ॥ ७३ ॥
गेला कर्पूर जळोनि । राहिला अनुहतध्वनि ।
ऐक्यरूपें समाधानी । सकळ राहिले ॥ ७४ ॥
नि. ध्या. ५४-७४.
११ जनस्वभावगोसावी.
९५. भोंदू गुरूंचे वर्णन.
अनीती अविवेकी अन्यायी । अभक्त अधर्म लंडाई।
वेदशास्त्र करील काई । तया मूर्खासी ॥१॥
कर्माच्या ठाई अनादर । नाहीं सगुण साक्षात्कार ।
ज्ञान पहातां अंधार । निश्चय नाहीं ॥२॥
उगाच गोष्टी ऐकिल्या । मना आल्या त्या धरिल्या ।
वेदशास्त्र करील काई । तया मूर्खासी ॥१॥
कर्माच्या ठाई अनादर । नाहीं सगुण साक्षात्कार ।
ज्ञान पहातां अंधार । निश्चय नाहीं ॥२॥
उगाच गोष्टी ऐकिल्या । मना आल्या त्या धरिल्या ।
- ↑ अमेय.