Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§९४ ]
१६७
निर्गुणध्यान.

शत्रु मित्रु देव जाला । सुखदुःखें परोपरीं ।
येकासी हांसवी देवो । येकासी रडवीतसे ॥
येकासी भाग्य दे देवो । येकासी करंटें करी ।
सर्व कर्तव्यता तेथें । येथें शब्दाच खुंटला ॥
शब्दज्ञान सरों आलें । ज्ञान सर्वत्र संचलें ।
जाणती जाणते ज्ञानी । मौन्यगर्भ विचारणा ॥

मानपंचक ४ १-२५.

१०. निर्गुणध्यान

९४. परममार्गाचें वर्णन.

चक्षूचें देखणें सरे । ज्ञानदृष्टि पाहोनि विरे ।
देखणेपणेंविण उरे । सर्वांगदेखणा ॥ ५२ ॥
अखंड चक्षु अर्धोन्मीलित । सकळ देखण्याचा प्रांत ।
जेथें अगोचरासहित । मुद्रा आटती ॥ ५३ ॥
श्रवण मनन निजध्यास । साक्षात्कारें जडे विश्वास ।
परमानंद सावकाश । होइजे स्वयें ॥ ५४ ॥
मुमुक्षु साधक सिद्ध झाले । तेही येणेचि मार्गे गेले ।
निखळ[] सुखें सुखावले । महानुभाव ॥ ५५ ॥
योगी वीतरागी उदास । चतुर्थाश्रम जो संन्यास ।
दिगंबर नाना तापस । येणेंचि मार्गे ॥ ५६ ॥
जोगी जंगम आणि सोपी । फकीर कलंदर नानारूपी ।

येणेंचि मार्गे स्वरूपी । पावती सकळ ॥ ५७ ॥

  1. श्रेष्ठ.