पान:रामदासवचनामृत.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [६९ नांच हे मानवी प्राणी। नीचाश्रय कामा नये। महत्कीर्ति श्रीरामाची। फावला महदाश्रयो॥....... विबुधां आश्रय ज्याच्या। पावले बदमोचनें। सेवकु मारुती ऐसा । त्याचा मी म्हणती जनीं। ... निवाला सीव ज्या नामें। ज्या नामें वाल्मीक रुसी। जें नाम सकळां तारी। तें नाम मज अंतरीं ॥ देव हा सर्व अंतरात्मा। वात हा त्याजपासुनी। वातसुत हनुमंतु । रामसेवक हा जनीं॥ सीव तो राघवा ध्यातो। राम ध्यातो सदासीवा। सख्यत्वें चालती दोघे । प्रसीध ठाउके जनीं॥ शक्ती ते शक्ती सीवाची। सीवशक्ती समागमें। औंश जे चंद्रमौळीचे। ते सर्व प्रभुचे सखे ॥ येकची अंश विष्णूचे। देवमात्र भुमंडळीं। येकांशें चालती सर्वै । यालागी सर्व एकची॥ ऐकती येकमेकांचें । येकमेकांसी पाहाती। जन्मले जीव ते सर्वै। एक देवची वर्तवी॥ रामउपासना ऐसी। ब्रह्मांडव्यापिनी पाहा। राम कर्ता राम भोक्ता। रामरूप वसुंधरा॥ विषयो जाहला देवो। नाना सुखें विळासवी। नाना दुःखें देव कर्ता। त्रासकें शरीरें धरीं॥ भुजंगें डंखितां देव । देव जाला धन्वंतरी। तारिता मारिता देव । बोलती ते येणें रिती॥ १ कारागृहातून सुटका.