पान:रामदासवचनामृत.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ १२ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. उद्वेग पाहतां नाहीं। चिंतामात्र नसे जनीं। व्याधी नाहीं रोग नाहीं । लोक आरोग्य नांदती ॥८॥ युध्य नाहिंच आयोध्या'। राग ना मछरु नसे बंद निर्बद ही नाहीं। दंड दोष कदा नसे ॥९॥ कुरूपी पाहतां नाहीं। जरा मृत्य असेचिना । आदरु सकळ लोकां । सख्यप्रीती परस्परें ॥१०॥ बोलणे सत्य न्यायाचें । अन्याय सहसा नसे। अनेक वर्तती काया। येक जीव परस्परें ॥११॥ दरिद्री धुंडितां नाहीं। मूर्ख हा तो असचिना। परोपकार तो मोठा। सर्वत्र लोकसंग्रहो ॥ १२॥ अद्भुत पीकती भूमी । वृक्ष देती सदा फळें । अखंड दुभती धेनु । आरोग्ये वाहती जळें ॥१३॥ जळजें स्वापदें पक्षी । नाना जीव भुमंडळीं। आनंदरूप बोभाती। नाना स्वर परस्परें ॥ १४ ॥ नद्या सरोवरें बावी । डोलती नूतनें बनें। फळती फुलती झाडें । सुगंध वनवाटिका ॥ १५ ॥ उदंड वसती ग्रामें । नगरें पुरेचि पट्टणें। तीर्थे क्षत्रे नाना स्लानें । शिवाल्ये गोपुरे बरीं ॥ १६ ॥ मठ मठ्या पर्णशाळा । रुसीआश्रम साजिरे। वेदशास्त्रधर्मचर्चा । स्नान संध्या तपोनिधि ॥१७॥ चढता वाढता प्रेमा। सुखानंद उचंबळे। संतोष समस्त लोकां । रामराज्य भुमंडळीं ॥१८॥ १ जेथें युद्ध नाही ती जागा. २ हांक मारणे. ३ विहिरी. ४ ऋषी,