पान:रामदासवचनामृत.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६३ १९२] मानपंचक.. दाही दिशा अवलोकितां । रामचि भासे तत्वतां । वदन चुकवू जातां । सन्मुख राम ॥९॥ राम झालिया सन्मुख । कल्पांती नोहे विन्मुख। नेत्र झाकितां अधिक । रामचि दिसे ॥ १०॥ मग विसरोनि पाहिलें । तंव तें रामचि झालें। जीव सर्वस्वे वेधले । संपूर्ण रामें ॥११॥ मग आपणा पाहे । तंव रामचि झाला आहे । उभय साक्षी जो राहे । तोचि राम ॥ १२॥ रामेंविण सर्वथा कांहीं । अणुमात्र रितें नाहीं। दृश्य द्रष्टा दर्शन तेंही। रामचि भासे ॥१३॥ प्रपंच सारिला मानसें। दृढ लागले रामपिसें । । देह वर्ते भ्रमिष्ट जैसें । पिशाचवत् ॥१४॥ रामरूपी वेधले मन । तेणें राहे कुलाभिमान । पूर्वदशेचे लक्षण । पालटोनि गेलें ॥१५॥ ऐसी खूण सकळांस । सांगोनि गेला रामदास। सत्संगें जगदीश । नेमस्त भेटे ॥३३॥ पं. स. ५. ५-३३. ९. मानपंचक. ९२. रामराज्य. राज्य या रघुनाथाचें। कळीकाळासी नातुडे। बहुवृष्टी अनावृष्टी । हे कदा न घडे जनीं ॥७॥ ..