Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§९०]
१६१
पंचसमासी.

नभासारिखें रूप या राघवाचें ।
मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें ॥
तया पाहतां देहबुधी उरेना ।
सदा सर्वदा आत पोटी पुरेना ॥ १९७ ॥

म. श्लो.

८. पंचसमासी.

९०. स्वरूपानुसंधान.
हे नवविध भजन । सायुज्यमुक्त साधन ।
तेणे करितां शुद्ध ज्ञान । प्राण्यास होय ॥१८॥
शुद्ध ज्ञानाचे बळें । अंतरीं वैराग्य प्रबळे ।
तेणें लिंगदेह मोकळे । होय वासनेसीं ॥ १९ ॥
लागे स्वरूपानुसंधान । नाठवे देहाभिमान ।
विश्रांतीतें देखे मन । तद्रूप होय ॥ २० ॥
आदिपुरुष एकला । नाहीं द्वैताचा गलबला ।
संगत्यागें अवलंबिला । शुद्ध एकांत ॥ २१ ॥
तेथें मन पांगुळलें[] । आपणांस विसरलें ।
आपणास भुलोन गेलें । स्वरूपबोधे ॥ २२ ॥
मी कोण हे न कळे । अवघा आत्मा प्रबळे ।
तेणे बळें मन मावळे । कर्पूरन्यायें[] ॥ २३ ॥
तेथें शब्द कुंठित झाला । अनुभव अनुभवी निमाला ।
आतां असो हा गलबला । कोणी करावा ॥ २४॥

  1. पांगुळे होणे.
  2. कर्पूरअग्निन्याय.