पान:रामदासवचनामृत.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. १६० [६८१ काहीं। रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. जनीं भोजनी नाम वाचे वदावें। अती आदरें गद्य घोषे म्हणावें ॥ हरीचिंतने अन्न जेवीत जावें। तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥ ८९ ॥ गजेंद्र महां संकटी वास पाहे। तया कारणे श्रीहरी धांवताहे ॥ उडी घातली जाहला जीवदानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥ ११८॥ नसे पीत ना श्वेत ना शाम कांहीं। नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं॥ म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे। मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १५० ॥ दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें । बरें पाहतां गूज तेथेंचि आहे ॥ करीं घेउं जातां कदा आढळेना। जनीं सर्व कोंदाटले ते कळेना ॥१५५ ॥ विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरु जाळितो लोक संव्हारकाळीं। परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५ ॥ तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले। तया देवरायासि कोण्ही न बोले॥ जगी थोरला देव तो चोरलासे। गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ।। १७९॥