पान:रामदासवचनामृत.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ९] मनाचे श्लोक सदा चकवाकासि मार्तड जैसा। उडी घालितो संकटीं स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥ ३७॥ जयाचेनि संगें समाधान भंगे। अहंता अकस्मात् येऊनि लागे॥ तये संगतीची जनी कोण गोडी। जये संगतीने मती राम सोडी॥४५॥ सदा देवकाजी झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य वाचा॥ स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥ मना राम कल्पतरु कामधेनु । निधी सार चिंतामणी काय वानूं ॥ जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां ॥ ६ ॥ उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे । तया अंतरीं सर्वदा तेंचि आहे ॥ जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागुता शोक जीवीं धरावा ॥ ६१ ॥ घनशाम हा राम लावण्यरूपी। महां धीर गंभीर पूर्णप्रतापी॥ करी संकटों सेवकांचा कुढावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६७॥ १ सूर्य. २ नौबद, नगारा. ३ संरक्षण. --- - 351