Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
[§८९
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.



मना चंदनाचे परी ता[] झिजावें ।
परी अंतरीं सज्जना नीववावें ॥ ८ ॥
मना पाहतां सत्य हे मृत्यभूमी ।
जितां[]बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥ १५ ॥
भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्यां दंडधारी ॥ २७ ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥
असे हो जया अंतरीं भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे च्यापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥
सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी[]
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥ ३६ ॥

  1. त्वां.
  2. जिवंत असतांना.
  3. देणारा, दान करणारा.