पान:रामदासवचनामृत.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५७ हु ८९] मनाचे श्लोक. रामें आपणांसारिखें केलें। दास दासपणेसी मुकले। रामासि मिळोनि एकचि जाले । एकपणाही वेगळे ॥ स्वामीसेवकपणे आनंदले। हर्षेकरुनि उचंबळले। परस्परें गिळोनि ठेले । लोभ आला म्हणोनि॥ ऐसे देवाभक्तांचे साजणें । जीव घेणे जीव देणे । पुन्हां मागुते येणे जाणे । न घडे कदा ॥ नवविधा भक्ति याचिकारणे । जे आपण स्वयें रामचि होणें। स्वयेंचि रामपणे ठाकणे । स्वानुभवें करूनो ॥ जु. दा. १६. १-१६. ७ मनाचे श्लोक. - - - - ८९. मनास प्रार्थना. मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरि पाविजे तो स्वभावें ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य तें सर्वभावें करावें ॥२॥ प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो।। जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो॥३॥ देहे त्यागितां कीर्ति मागे उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥ १ प्रीति, सख्य.